Thursday, January 1, 2015

शांत झोपेत अचानक्

शांत झोपेत अचानक् जाग आली होती,
सर पावसाची कोसळत होती!
चिंब अंगांग, चिंब आसमंत,
चिंब सृष्टी चिंब न्हाली होती,
पाणी वाढताना उमगले, पातळी दारांत आली होती!
शांत झोपेत अचानक् जाग आली होती

घाबरा मी हिला म्हणालो, 
अगं पाणी घरांत घुसले,
थैमान घालतो पाउस, ती धावली...
काही आणायाला, मी ही धावलो,
सापडेना काहि... आता...
मंत्र सूर्य म्हणू...
शांत झोपेत अचानक् जाग आली होती...

धांडोळा मग मंत्रांचा, 
सपाटा उच्चारवांचा, कुठला मंत्र, यंत्र कुठले,
शांत स्त्ब्ध अंतरंग सारे ,
पाणी घरात त्यात तरंगे संसार!
हि शोधते काहि.. अजूनहि...
चिडून, रडून, भांडून, थकून...
शांत झोपेत अचानक् जाग आली होती...

स्वप्नच होते सारे, तरी पाणी आले होते,
चिंब पावसाने तरी सारे कुठे भिजले होते!
असेच व्हायला नको होते, 
स्वप्नातल्या पावसाने.. खरे खरेच 
भिजवायला हवे होते!
शांत झोपेत अचानक् जाग आली होती...


हिमांशु डबीर

No comments:

Post a Comment