Wednesday, April 29, 2020

पालखी

शुष्क निष्प्राण अधर वाट पाहतील तुझी
ये त्या क्षणी, थांबली पालखी माझी

काही नको तुजकडून, साथ दे जन्मांतरी
रक्षेन तुला सदा, स्मरून ती सप्तपदी
मिटून येईल नेत्र पालवी, निस्तेज हो सूर्यही
ये सखे त्या क्षणी, थांबली पालखी माझी

आज आहे, उद्या काय, श्वास माझा तूच की
लय ना उसवेल, ना बिनसेल सुरही
जपमाळ श्वासांची, संपेल या आवर्तनी
ये सखे त्या क्षणी, थांबली पालखी माझी

साथ ना सोडेन, दिले तुलाच वचन मी
खुंटता जपमाळ, श्वास माझा तुझ्या अंतरी
येशील फुलोनी, बरसात आठवांची
ये सखे त्या क्षणी, थांबली पालखी माझी

शुष्क निष्प्राण अधर, होऊ दे बरसात आसवांची
ना उघडले नेत्र, तरी मोहरेन मी अंतरी
प्राणपाखरू माझे, तव गगनी विहारी
ये सखे त्या क्षणी, थांबली पालखी माझी

यशवंतसुत