Monday, April 4, 2016

कृष्ण

कृष्ण


कसल्या त्या वेदना,
आता सुखाचा घास दे!
गंध-मिश्रित पाणी नको,
तुझे तिखट खड्ग दे!

गाभा-यातील ज्योत नको,
आता संपूर्ण प्रकाश दे!
कुठलीच आरती नको आता,
तुझे चक्र-सुदर्शन दे!

कुठलेसे घाव-वार,
आता निरव शांती दे!
कबुतरांचे थवे नको,
तुझा पेटला अंगार दे!

खूप झाले दूत-शांती,
आता काहीसे "कृष्ण" दे,
प्रस्ताव कुठलेच नको,
तुझे रुद्र-महा दे!


हिमांशु डबीर
०५-एप्रिल-२०१६