Thursday, January 1, 2015

वेडंच होते ना ते...!

वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!
तो अर्ध-उध्वस्त कट्टा,
तो फेसाळणारा सोडा,
तो मोरपंखढापलेला,
तो सुगंधी एकांततुझ्यापासून चोरलेला!
वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!

वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!
ते बेधुंद वारे,
ते मनसोक्त फिरणे,
ती मौनातली भांडणे,
ते लडिवाळ स्पर्शकधी नकळत तर कधी मुद्दामलेले!
वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!

शब्दांमधून उमलणारी तू आजही 
जुन्या कवितांतूनही  भेटत राहतेस,
मोरपिसांतून झळाळणारी तू आजही
कृष्ण-सावळ्या मेघांतूही पाझरत राहतेस!
मनगाभा-यात दरवळणारी तू आजही
सोनचाफ्यातून उमलत राहतेस!
वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!

वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!

हिमांशु डबीर

No comments:

Post a Comment