Monday, April 4, 2016

कृष्ण

कृष्ण


कसल्या त्या वेदना,
आता सुखाचा घास दे!
गंध-मिश्रित पाणी नको,
तुझे तिखट खड्ग दे!

गाभा-यातील ज्योत नको,
आता संपूर्ण प्रकाश दे!
कुठलीच आरती नको आता,
तुझे चक्र-सुदर्शन दे!

कुठलेसे घाव-वार,
आता निरव शांती दे!
कबुतरांचे थवे नको,
तुझा पेटला अंगार दे!

खूप झाले दूत-शांती,
आता काहीसे "कृष्ण" दे,
प्रस्ताव कुठलेच नको,
तुझे रुद्र-महा दे!


हिमांशु डबीर
०५-एप्रिल-२०१६

4 comments:

  1. मला हि असेच वाटते. गुढी पाडव्याच्या दिवशी भगवंताशी हेच मागणे योग्य.

    ReplyDelete
  2. आवडली. पाकिस्तानच्या संदर्भात लिहिलेली आहे वाटते.

    ReplyDelete
  3. Mitra Vivek! rokh chaan olakhalat! titkech nahi tar sadhya aaplya bahninvar je atyachaar hot aahet te pahunahi hech magavese watate!

    ReplyDelete