Wednesday, September 22, 2010

ऐक साजणा तु ऐक ना रे

ऐक साजणा तु ऐक ना रे!

ऐक साजणा तु ऐक ना रे
असा मजकडे पाहू नको रे
शब्द माझे कंपित रे
अन् सुचे तुल हि भलती मजा रे!

ऐक साजणा तु ऐक ना रे
तारकांनीहि पहा घेतले निरोप रे
पहाटवा-याने या शहारते काया रे,
अन् तुला सुचती हे खुळे हट्ट रे!

ऐक साजणा तु ऐक ना रे
उष्ण-गंधित स्पर्श तुझे रे
देहावरी फुलले रोमांच रे
अन् बेबंध होती हे श्वास रे!

ऐक साजणा तु ऐक ना रे
रंगात आली प्रणयवेला रे
छेडिलेस तु असे रे,
कायेतुन उमटला हा झंकार रे!

ऐक साजणा तु ऐक ना रे
उरात पेटे तप्तसा निखारा रे
आवेग तुझे आवरू कसे रे
सावर राजा सावर तू तोल रे!


हिमांशु डबीर
१६-सप्टेंबर-२०१०

No comments:

Post a Comment