Friday, August 27, 2010

आरंभ!

आरंभ!

बंध-पाश सारे इथेच विरती,
मम आत्म्याने कात टाकली!

श्वास मुक्तला पिंजा-यातूनी,
मम आत्म्याने कात टाकली!

मार्ग दिसला स्वर्गारोहिणी,
मम आत्म्याने कात टाकली!

हृदयात घुमला ओंकार ध्वनी
मम आत्म्याने कात टाकली!

सुटली आशा अन् वृत्ती निमाली,
मम आत्म्याने कात टाकली!

सजवून देह निघालो वैकुंठी,
मम आत्म्याने कात टाकली!

सवे चालती गुरू-माउलि,
मम आत्म्याने कात टाकली!

हिमांशु डबीर
१३-ऑगस्ट-२०१०
प्रेरणा स्त्रोत:- बाबांनी दिलेली "आत्म्याने कात टाकली" ही ओळ

2 comments:

  1. अरे, कोणी गुरु-माउली बरोबर येत नाही. देह-कात अजूनही सजवत आहेस मग आशा सुटली असे कसे काय म्हणतो?

    ReplyDelete
  2. नमस्कार प्राध्यापक प्रकाशजी, माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

    कृपया आपण आपला परिचय द्यावा, म्हणजे आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल आपणांस योग्य प्रत्त्युत्तर देणे मला सोयीस्कर जाईल!

    हिमांशु!

    ReplyDelete