Wednesday, September 10, 2014

अंधारावर विजय प्रकाशाचा!

अंधारावर विजय प्रकाशाचा!

सकाळी आज तू व्यूव्ह  रचून आलास
सारा आसमंत काळा-कुट्ट करून ठेवलास
वाटले आता तू डेरे-दाखल झालास...
पण हाय रे दुर्दैवा... पुन्हा आज सूर्याने तुझा व्यूव्ह फोडला!

किंचितसा ओलावा, त्यामागून आला तो जाळणारा कवडसा...
तुझ्या पराभवाचा, कि विजय "काळ्या ढगाच्या सोनेरी झालरीचा"?
खूप वाट पहिली रे.. तू येशील म्हणुनी....पण दुर्दैव हेच कि,
"अंधारावर विजय प्रकाशाचा!"

चार थेंब पाडून, भुई थोडी ओली करून भागलास
एरवी हवी ती "निळाई" आज नकोशी सोडून गेलास!
वाटते हा तुझा डाव असावा... चढाई आधीचा तू पवित्रा घेतलास...
वेडी आहे आशा, तिला अजून तुझ्या आगमनाची आस...

तुझा तो अंधारमय प्रकाश आहे हवा-हवासा
मानाचा हिरवा-शालू अजून पहा अजून तसाच नटलेसा
प्रणय तुझा-धरेचा अजून शेष सुरुवातीसा
ये रे मित्रा सहस्त्राधारा, तुझाच भरोसा.. किंचितसा !!!

हिमांशु डबीर
१०-जुलै-२०१४ 

No comments:

Post a Comment