Tuesday, May 26, 2009

चंचला

चंचला

चिंब भिजल्या जलधारांसम,
मी ज्वलंत बुलंद आहे!
देवा-धर्माच्या नास्तिकांनो,
वीज ती, माझा हुंकार आहे!


गरजणा-या मनस्वी मेघांसम,
मी भीषण भयाण आहे!
उलट्या काळजाच्या मानवी पशूंनो,
मनस्वीता ती, माझी धमनी आहे!


कडाडणा-या त्या चारूतेसम,
मी प्रताप रुद्र आहे!
कलीयुगाच्या पुजा-यांनो,
चारुता ती, माझा श्वास आहे!


काळ्या नभातील चंचलेसम,
मी रौद्र-क्रुद्ध आहे!
सावध असा षंढांनो,
चंचला ती, माझी सखी आहे!


हिमांशु डबीर

२६ मे २००९

2 comments:

  1. बापरे! एकदम कडक! पण छान आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद, फडणीस साहेब! खरतरं हि एक सलग कविता नाही, "वीज" या संकल्पनेवर सुचलेल्या या चार वेगवेगळ्या चारोळ्या आहेत ज्यांना मी "चंचला" या नावाखाली एकत्र आणले आहे!

    आपल्या अभिप्रायाबद्दल आपले आभार!

    हिमांशु

    ReplyDelete