Thursday, May 28, 2009

बायको, हे फक्त तुझ्यासाठी...

माझ्या पत्नीला - निकिताला, माझ्या मिठीत जेव्हा जेव्हा पाहतो, तेव्हा तेव्हा मला असेच वाटते!!!
जेव्हा ती आता भारतात अन् मी अमेरिकेत आहे, तेव्हा तिची ओढ जास्त जाणवते!
-------------------------

तुला पाहताना शब्द वाक्यांना मिठी मारुन बसतात,
अन् वाक्ये नजरेतून बोलू लागतात,
तू माझी होताना, शब्द मिठीतच विरघळतात,
मिठी ती किती हळवी, शब्द त्यातही गुदमरतात,
तुझ्यामाझ्या प्रेमाचे क्षण, नित्यनविन अलंकार लेवून,
शब्दही त्यांचे सोहळे साजरे करतात!


हिमांशु डबीर

1 comment:

 1. पंत,
  फारच सुरेख कविता आहे.
  मला अजूनही आठवते की हार्टफॉर्ट मधे तुमच्या अपार्टमेंट मधे आपली मैफिल जमली होती आणि तुम्ही नुकतीच ही कविता लिहिली होती.
  सुंदर.

  -अभी

  ReplyDelete